येलो रिबन एनजीओ फेअरमध्ये अनामप्रेमचा प्रथम क्रमांक.!
anampreminfo
Oct 12
1 min read
पुणे येथे १ ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित ‘येलो रिबन एनजीओ फेअर – कला कृषी बाजार’ प्रदर्शनात अनामप्रेम संस्थेने उत्कृष्ट स्टॉल सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक व ₹५० हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. तसेच, संस्थेच्या विविध उत्पादनांची सुमारे ₹३५ हजारांची विक्री झाली.
दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्याला बाजारपेठ, त्यांच्या श्रमांना सन्मान आणि स्वावलंबनाला नवी दिशा देणारे हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे.
संधी मिळाली, तर दिव्यांग व्यक्तीही कर्तृत्वाचा नवा इतिहास घडवू शकतात.

!




Comments