top of page

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत 'AESA' असोसिएशनने साजरा केला रक्षाबंधन उत्सव; अनामप्रेम संस्थेला संगणक संच भेट

anampreminfo
Sep 10
1 min read

अनामप्रेम संचालित ‘सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प’, निंबळक येथे रविवारी, ३० ऑगस्ट २०२६ रोजी ‘आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (AESA), अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमादरम्यान AESA असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करत सामाजिक बांधिलकी जपली. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना हातभार म्हणून असोसिएशनच्या वतीने अनामप्रेम संस्थेला संगणक संच भेट देण्यात आला; तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यासोबतच सौ. वंदना कुलकर्णी मॅडम यांच्याकडून ‘स्मार्ट टॅलेंट सर्च’ स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी उपयुक्त एज्युकेशन संच देण्यात आले.

कार्यक्रमात ‘प्रकाशगान’ संगीत टीमने बहारदार गाणी सादर करून वातावरणात रंग भरला. विशेषतः गौरी इंगळे या विद्यार्थिनीने अत्यंत उत्कृष्ट शैलीत गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाच्या ध्वनिक्षेपण व माईक ऑपरेटिंगची जबाबदारी महेश तांदळे यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून अनामप्रेम संस्थेचे अध्यक्ष इंजि. अजित माने व अनिता माने यांनी सर्व उपस्थितांचे आपुलकीने स्वागत केले. AESA असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि सामाजिक सहभागाचे उपस्थितांकडून मनापासून कौतुक करण्यात आले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:

या विशेष सोहळ्याला AESA चे अध्यक्ष इंजि. प्रदीप तांदळे, उपाध्यक्ष इंजि. सुनील औटी, सचिव इंजि. भूषण पांडव, सौ. किरण आप्पासाहेब जाधव, सेवानिवृत्त सरकारी वकील ॲड. मोहन परोपकारी, अनिल धोकरिया, शेख साजिद, श्री. रमेश सर, सौ. नीता महेश घावटे, मंजुषा शिवगुंडे, सौ. मोनाली बोरुडे, सौ. प्राची लाटे, सौ. अनुजा खांडेकर, भारती खांडेकर, प्रणाली प्रदीप तांदळे, सागर धागे, महेश तांदळे, संतोष खांडेकर, अमोल, राकेश राऊत, अशोक कुलकर्णी, आदिनाथ आंबेकर, रोहित लूनिया, प्रमोद सूर्यवंशी, अनमोल जैन, सुमतीलाल, श्रीशैल शिवगुंडे, तरन्नुम सय्यद, सुशील देठे, सचिन दादा, संदीप आणि डॉ. दिलीप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments


Anamprem

Anamprem is a Sister organization of NGO Snehalaya established in the year 2005 in Ahilyanagar district.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • LinkedIn

Contact Us

Anamprem Bhavan, Gandhi Maidan, Ahilyanagar 414001

Satyamev Jayate Gram Address : Anamprem Satyamev Jayate Gram Prakalp, Ravinanda Sankul, Nimbalak, Ahilyanagar 414111

9011004576 / 7350517778

anampreminfo@gmail.com

bottom of page