अनामप्रेमच्या कार्याचा सन्मान..!
दिव्यांगांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित करत त्यांना शिक्षण, पुनर्वसन, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अनामप्रेम संस्थेच्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची पुन्हा एकदा सन्मानपूर्वक दखल घेण्यात आली आहे.
'द पब्लिक ब्रॉडकास्ट मीडिया कंपनी' यांच्या वतीने आयोजित ‘द पब्लिक एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय आणि समाजाभिमुख कार्याबद्दल अनामप्रेम संस्थेला पुरस्काराने गौरविण्यात आले.
उद्योजक एन. बी. धुमाळ साहेब तसेच प्राचार्य मा. श्री. खासेराव शितोळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात संस्थेच्या वतीने डॉ. मेघना मराठे आणि श्री. अमृत भुसारी यांनी हा सन्मानाचा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार केवळ अनामप्रेम संस्थेचा गौरव नसून, दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे नवे क्षितिज निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या संस्थेच्या संपूर्ण कार्यपरिवाराच्या समर्पित प्रयत्नांचा सन्मान आहे.
हा गौरव अनामप्रेमच्या कार्याला मिळालेली पोचपावती असून, समाजातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांच्या जीवनात आशेचे नवे रंग भरत राहण्याची प्रेरणा देणारा आहे..!







Comments