top of page

अनामप्रेम स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटरच्या गणेश बावस्कर याची महाराष्ट्र राज्याच्या T20 क्रिकेट संघात निवड

  • anampreminfo
  • Feb 13
  • 1 min read

नॅशनल व्हीलचेअर क्रिकेट चॅम्पियनशिप T20 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा ग्वाल्हेर येथे पुढील महिन्यात होणार आहेत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्यासाठी अनामप्रेम स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटरचा लाभार्थी व कोऑर्डिनेटर गणेश बावस्कर याची निवड केली आहे. गणेशने नुकत्याच पार पडलेल्या व्हीलचेअर वनडे क्रिकेट मंध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघाकडून सर्वात जास्त धावा केल्या होत्या. गणेशच्या निवडीचा अनामप्रेम परिवाराला सार्थ अभिमान आहे. गणेशला अनामप्रेमच्या स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटर मध्ये उपचारासाठी मागील वर्षी झोळीतून आणले होते. तोच गणेश आज महाराष्ट्राचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे. गणेश त्याच्या या यशाचे श्रेय डॉक्टर प्रकाश शेठ, विखे पाटील हॉस्पिटल मधील फिजिओथेरपी देणारे डॉक्टर आणि संपूर्ण अनामप्रेम परिवाराला देत आहे.



Comments


Anamprem

Anamprem is a Sister organization of NGO Snehalaya established in the year 2005 in Ahilyanagar district.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • LinkedIn

Contact Us

Anamprem Bhavan, Gandhi Maidan, Ahilyanagar 414001

Satyamev Jayate Gram Address : Anamprem Satyamev Jayate Gram Prakalp, Ravinanda Sankul, Nimbalak, Ahilyanagar 414111

9011004576 / 7350517778

anampreminfo@gmail.com

bottom of page