• anampreminfo@anamprem.org
  • 9011020174

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चे मोठे स्थलांतर निर्माण करणार अनेक प्रश्न

Start time 2020-05-16
Finished Time 2023-02-25 12:28
Speakers
Content

कोरोनाच्या प्रभावामुळे कामगारांचे मोठे स्थलांतर होत आहे. मुंबई-पुणेसह कोकणातील मोठी शहरे,उरण बंदर, पश्चिम महाराष्ट्र येथून लाखो परप्रांतीय तिसऱ्या लॉक डाऊन च्या शेवटी आपल्या राज्यात माघारी जात आहेत. प्रवासासाठी हे परप्रांतीय मिळेल त्या प्रवास साधनांचा उपयोग करत आहेत. स्नेहालय-अनामप्रेम-आय लव नगर- लाल टाकी मित्र मंडळ,आमी संघटना- क्रॉम्प्टन कंपनी,हेलपिंग फॉर हंगर ग्रुप या परिवाराच्या *राहत केंद्र* येथून कोरोनाच्या भीतीने स्थलांतर करणाऱ्या परप्रांतीयांना अन्न-पाणी दिले जात आहे. राहत केंद्राचा आजचा सहावा दिवस आहे. रोज सरासरी 4 हजार स्थलांतरित मजूर या केंद्राची मदत घेत आहेत. नगर-मनमाड बायपासवरील निंबळक गाव नजीक हे सेंटर सुरू आहे. कोरोना या महामारीत तिचा प्रादुर्भाव रोखणे हे खूप महत्वाचे आहे. कोणतेही औषध अद्याप या महामारीवर नसल्याने खूप भीती अनेक मजुरांमध्ये दिसत आहे. ही भीती अनेक मजुरांशी बोलल्यावर *राहत केंद्रावर* जाणवत आहे की रोगाविषयी खूप गैरसमज पसरले आहेत.पायपीट ही भुकेमुळे सुरू झाली आहे.

सोहेल हा पश्चिम बंगालमध्ये वेल्लोर जवळचा आहे. तो राहत केंद्राची मदत घ्यायला आला होता. तो मुंबईतून मोठ्या ट्रक ने गावी निघाला आहे. त्याच्या सोबत बांधकामावर लेबर काम करणारे 53 मजूर आहेत. सगळे तिशीच्या आतले आहेत. लॉक डाऊन ने त्यांची सगळी बचत संपवली. कोरोनाच्या संसर्गाची भीती मनात कायम आहे. यामुळे ही माणसे वाट्टेल तेवढे गाडी भाडी देऊन गावी निघाल्याचे सोहेल याने सांगितले. या ट्रक मध्ये मुंबई ते पश्चिम बंगाल तिकीट 11 हजार रुपये प्रत्येकी आहे. सोहेल ला घरी जाऊन त्याच्या अम्मीला तात्काळ भेटायचे आहे असे त्याने जाताना आवर्जून सांगितले. या प्रवासात ना काळजी ना जेवण-पाणी सोय.. गावाकडे जाऊन काय करणार हा प्रश्न आहेच. सगळे परमेश्वराच्या हातात असे सोहेल बोलताना म्हणाला.

मेंग्लोर कर्नाटक येथून राजस्थान ला निघालेले 22 तरुण सायकलवर निघालेत. 2476 किमी चा प्रवास हे सर्वजण करत आहेत. टाईल्स काम करणारे हे सर्व मजूर मनरेगा ची कामे करून जगायचे म्हणाली आहेत. एवढा प्रवास सायकलवर होईल का..? असे विचारल्यावर उत्तर ऐकले की *जिना मरना अब अपने हात नही है*..!!

शालन बाई व तिच्या सोबत 16 जणी राहत वर आल्या होत्या. या धुळे जिल्ह्यातुन मेंढरे व घोड्यावर संसार घेऊन जुन्नर तालुक्यात निघाल्या आहेत. पाऊस येण्या आधी यांना गावी पोहचायचे आहे. शालन बाई शी बोलल्यावर त्या म्हणाल्या की, कोरोनाला आम्ही अजिबात घाबरत नाही. कोरोना आम्हा रानावनात भटकणाऱ्याना होणार नाही. शहरातल्या,एशीत राहणाऱ्यांना होतोय असे त्या म्हणाल्या.

अब्बू नावाचे उंटकरी आज राहत वर आले होते. ते कर्नाटकातून गुजरात ला उंटावरून निघालेत. त्यांच्या टोळीत 3 उंट आहेत. पाणी-जेवण याची कोणतीच तयारी न करता,रोजगार हरवलेले हे लोक कसेही करून गावी पोहचण्याच्या इराद्यात आहेत.

रोज राहत केंद्रावरून जाणारे हे स्थलांतर भारताला स्वातंत्र्य मिळण्यानंतर चे सर्वात मोठे स्थलांतर आहे. भूक-भीती हे स्थलांतर घडवत आहे. यानंतर मात्र पुढे हिंसा जन्म घेईल अशी भीती वाटत आहे. मानवी इतिहासात पूर्वी दुष्काळ-पूर-युद्ध-महामारी-रोजगार-फाळणी यामुळे स्थलांतर घडले आहे. माणसे अशी स्थलांतरित होताना महिला-मुली-बालके-दिव्यांग-वृद्ध यांचे अपरिमित हाल होत आहेत… हे आता सहन होण्यापलीकडे आहे .