• anampreminfo@anamprem.org
  • 9011020174

लॉकडाऊन काळात बेरोजगार दिव्यांगासाठी अनामप्रेम च्या युथ फॉर जॉब ट्रेनिंग सेंटर चे ऑनलाइन वर्ग सुरु

Start time 2020-05-09
Finished Time 2023-02-25 12:28
Speakers
Content

बेरोजगार दिव्यांग मुला-मुलीसाठी अनामप्रेम च्या वतीने युथ फॉर जॉब हे ट्रेनिंग सेंटर चालवले जाते. कोरोना महामारीच्या काळात सर्व देश लॉक डाऊन आहे. दिव्यांग मुला-मुलींना या लॉक डाऊन काळात घरबसल्या ऑनलाइन नोकरी प्रशिक्षण वर्ग घेण्याचा प्रयोग युथ फॉर जॉब व अनामप्रेम ने करायचा ठरवला आहे. अपंग ,मूकबधिर समाज घटकाने इंटरनेट व अँड्रॉइड फोन द्वारे हे प्रशिक्षण घेणे गरजेचे झाले आहे. नव्या काळात ऑनलाइन जॉब करण्याची सवय दिव्यांग यांना व्हावी असा अनामप्रेम चा प्रयत्न यामागे आहे. पात्र दिव्यांग उमेदवारांना रोज सकाळी 10 ते 5 यावेळेत सलग 15 दिवस हे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कोर्स मध्ये मूकबधिर मुलां-मुलींना व्हिडीओ कॉल द्वारे सांकेतिक भाषेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या 15 दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीत संगणक कौशल्य, बेसिक इंग्रजी भाषेचे ज्ञान, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास , कोरोनानंतर घ्यावयाची काळजी आदी विषय शिकवले जाणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या दिव्यांगांना व्हॅलीओ प्रा.लि., धुत प्रा.लि., मिडा प्रा.लि. यासह विविध मॉल मध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कामाचे स्वरूप व पगार हे प्रशिक्षणा नंतर ठरवले जाणार आहेत. वय वर्षे 18 ते 32 वयोगटातील मूकबधिर व अस्थिव्यंग याच गटातील दिव्यांग करीता हे प्रशिक्षण वर्ग असणार आहेत. पहिल्यांदाच हा अनामप्रेम च्या वतीने हे ऑनलाइन कोर्स होत आहेत. अशा प्रकारचे कोर्स घेण्यासाठी डॉ.प्रकाश शेठ, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.रवींद्र सोमाणी, इंजि.अजित माने, इंजि. राधा मिलिंद कुलकर्णी, अजित कुलकर्णी यांनी या ऑनलाइन कोर्स करिता सहयोग- मार्गदर्शन केले आहे. इच्छुक दिव्यांग यांनी 7350640303/9272515212/7350013801/9011020174 या क्रमांकावर सम्पर्क करावा, असे अनामप्रेम च्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.