• anampreminfo@anamprem.org
  • 9011020174

लॉकडाऊनच्या काळात अनामप्रेम च्या दिव्यांगांनी शोधला मन रमवण्याचा मार्ग

Start time 2020-04-13
Finished Time 2022-03-16 08:50
Content

http://littlemagonline.com/tag/jewish-artists/ लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सामान्य समाज वेगवेगळी दिनचर्या जगत आहेत. दिव्यांग मुला-मुलींसाठी हा काळ मात्र अवघड झाला आहे. अनामप्रेम च्या अंध-अस्थिव्यंग-मुकबधीर-अपंग मुला-मुलींनी हा कठीण सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अनामप्रेम च्या सर्व प्रकल्पातील लाभार्थी हे सत्यमेव जयते ग्राम निंबळक ता.जि. अहमदनगर येथे एकत्रित झाले आहेत. येथे रोज कॅरम, झोका,बुद्धिबळ,मोबाईल, टीव्ही ऐकण्यात ते मन रमवत आहेत. सध्या सत्यमेव जयते ग्राम मध्ये 60 दिव्यांग मुले-मुली असून कोरोना प्रकरण कधी संपेल याची वाट पाहत आहेत.

Talā कोरोना बचावासाठी विविध उपाय ही दिव्यांग मुले-मुली करीत आहेत. साबणाने सतत हात धुणे,मास्क वापरणे, एकमेकांच्या मधील अंतर पाळणे, रोज प्राणायाम व योगासने करणे हे सुरू आहे. अंध व अस्थिव्यंग मुला-मुलींसाठी कोरोना पासून बचाव करण्याचे उपाय अंमलात आणणे खूप कठीण जात आहे. अनामप्रेमसारख्या सामाजिक संस्थांना सद्यस्थितीत व पुढील काळात सेवाकाम करणे आव्हानात्मक असणार आहे. या लॉक डाऊन काळात सर्व दिव्यांग मुले-मुली सतत बातम्या ऐकत आहेत. जगातील कोरोनाचे अपडेट घेत आहेत. सत्यमेव जयते ग्राम मधील मोकळ्या परिसरात सर्व दिव्यांग मोकळा श्वास घेत आहेत. सर्वजण कोरोनापासून सुरक्षित रहावेत अशी ईश्वराकडे प्रार्थना येथे केली जात आहे.