• anampreminfo@anamprem.org
  • 9011020174

राज्यातील अंध-दिव्यांगासाठी अनामप्रेम चा कोरोना जनजागृती ब्रेल प्रकाशवाटा अंक प्रकाशित

Start time 2020-04-28
Finished Time 2023-10-03 07:17
Content

अनामप्रेम या सामाजिक संस्थेच्या वतीने अंध-दिव्यांगासाठी ब्रेल लिपीतील कोरोना जनजागृती विशेषांक याचे आज प्रकाशन करण्यात आले. जगभर कोरोना या महामारी चे तांडव सुरू आहे. कोरोनाच्या या महामारीची माहिती विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. समाजातील अंध व दिव्यांग या समाजघटकापर्यंत कोरोना बाबतची सर्व माहिती ब्रेल लिपीत असणे आवश्यक आहे. या महिन्याचा प्रकाशवाटा मासिकाचा ब्रेल अंक “कोरोना विशेषांक” म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. अनामप्रेम चा प्रकाशवाटा हा ब्रेल लिपीतील अंक मागील 6 वर्षांपासून दरमहा प्रसिद्ध होत असतो. या महिन्यात संपूर्ण कोरोनाची माहिती या ब्रेल मासिकात देण्यात आली आहे.

या ब्रेल अंकात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी संसर्गाची सांगितलेली कारणे, महामारीचे उगमस्थान, अंधानी घ्यावयाची काळजी, टाळेबंदीत घरात राहण्याचे महत्व, सॅनिटायर कसे वापरायचे ,आहार व व्यायाम,प्राणायाम यांचे महत्व, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी या महामारीत दिव्यांगांना दिलेला मदतीचा हात आदी माहिती या ब्रेल अंकात विशद करण्यात आलेली आहे. या ब्रेल अंकाची निर्मिती ऍड.अनुजा कुलकर्णी यांनी केली आहे. या प्रकाशवाटाचे 400 ब्रेल अंक महाराष्ट्रात पोस्ट सर्व्हिस च्या माध्यमातून या लॉक डाऊन च्या काळात वितरित करण्याचे नियोजन ऍड.अनुजा कुलकर्णी यांनी केले आहे. हे ब्रेल अंक अनामप्रेम कडे नोंदणी कृत अंध वाचक, राज्यातील शैक्षणिक संस्था, विशेष अंध शाळा यांच्या पर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. या प्रकाशवाटाच्या अंकाचे प्रकाशन अनामप्रेम चे अध्यक्ष इंजि.अजित माने, सचिव दीपक बुरम, उमेश पडूंरे, रामेश्वर फटांगडे, राधा मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने आज अनामप्रेम करण्यात आले आहे.