• anampreminfo@anamprem.org
  • 9011020174

महाराष्ट्र भुखा जाने नही देगा…! यह भावना जीने का सहारा है..!!!!! उत्तर प्रदेशला (बस्ती जिल्हा) दुचाकीवर निघालेल्या 6 तरुण मजुरांची भावना

Start time 2020-05-13
Finished Time 2023-02-25 12:27
Speakers
Content

लॉक डाऊन के 50 दिन बीत गये! हम सब 10 लोक 100 स्क्वेअर फूट की खोली मे रहते थे.! कोरोना खत्म होने की राह देखते रहे, लेकीन सह नही पाये,कोरोना का भय..! तो पुरानी एम.ए. टी गाडी पर सवार हुये, हम सब बस्ती जिला उत्तर प्रदेश को जा रहे है.! महाराष्ट्र ने आज तक हमे रोटी दियी है.! इस कोरोना के हाल मे महाराष्ट्र हमे भुखा नही जाने देगा यह भावना से हम अपने जान पर यह लंबी सवारी कर रहे है.! हा संवाद आहे दुचाकीवर उत्तर प्रदेश कडे जाणाऱ्या तरुणांचा. ‘राहत केंद्र’ येथे आलेल्या हे 6 तरुण मजूर आहेतवीस – पंचवीस वर्षाचे. कोरोना व वाढते लॉक डाऊन यामुळे पुणे(येरवडा) येथून उत्तर प्रदेश येथील बस्ती जिल्ह्यात हे तरुण मजूर दुचाकी वर तब्बल 1600 किमी अंतर कापत निघाले आहेत. भर दुपारच्या उन्हात ते राहत केंद्रात आले त्यांनी यावेळी अन्न-पाणी देण्याचा महाराष्ट्र धर्म अनेकवेळा बटबटलेल्या डोळ्यांनी बोलून दाखवला.

नगर-मनमाड बाय पास हायवे वर असणाऱ्या ‘राहत केंद्राचा’ आज तिसरा दिवस आहे. अहमदनगर येथील स्नेहालय-अनामप्रेम परीवार, आय लव नगर, आमी संघटना, अहमदनगर वासीयांच्या माध्यमातून तीन दिवसांपूर्वी नगर मनमाड बायपास हाय वे वर ‘राहत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात स्वतःच्या गावी,परराज्यात जाणाऱ्या मजुरांना मोफत अन्न, पाणी दिले जात आहे. मागील 3 दिवसात या केंद्रामधून उत्तर भारताकडे जाणाऱ्या किमान 2965 मजुरांना मदत झाली आहे. आगामी 31 मे पर्यंत या महामार्गावरून 1 लाखापेक्षा जास्त मजूर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मुळे हे केंद्र मजूर जाईपर्यंत चालवले जाणार आहे.

राहत केंद्रातील विश्राम क्षात उत्तर प्रदेशातील या मजुरांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की,लॉक डाऊन च्या मागील 50 दिवस ते पुण्यात 10 बाय 10 च्या छोट्या रूम मध्ये अडकून होते. सार्वजनिक शौचालय चा वापर हे लोक करीत होते. शेकडो लोक एकत्र ते ज्या एरियात राहत होते तिकडे राहत असल्याने कोरोनाच्या भीतीत ते 50 दिवस नीट झोपू शकले नाहीत. कोरोनाच्या भीतीने व रोजगार गेल्याने हे तरुण दुचाकीवर घरी जाण्याच्या निर्णयावर येऊन पोहचले. सोबत कोणताच शिधा नाही ना कोणतीच पाणी व्यवस्था. पैसे खिशात नसताना केवळ इंधन रक्कम सोबत घेऊन हे मजूर निघालेत. स्वतःच्या जीवावर बेतू शकणारा हा धोकादायक प्रवास हे मजूर करीत आहेत. घरची चौकशी केल्यावर समजले की, घरी किमान 40 ते 50 गुंठे जमीन आहे. सिंचन व्यवस्था नाही. घरात खाणारी तोंडे खूप आहेत. केवळ 10 वी शिक्षण झालेले हे तरुण फर्निचर बनवण्यात पारंगत आहेत. आता गावाकडे या फर्निचर व्यवसाय कौशल्याचा फारसा उपयोग होणार नसल्याने आम्ही काय करू..?हा त्यांचा प्रश्न कंठ दाटून आणणारा होता. गावाकडे रोजगाराचा कोणता पर्याय असू शकतो असे विचारल्यावर कळले की, मनरेगा किंवा दुसऱ्याच्या शेतात मजुरी. केवळ जगणे हाच उद्देश समोर असल्याचा विचार या तरुणांनी बोलून दाखवला.

खचा खच भरलेले ट्रक, सुसाट जाणाऱ्या दुचाकी, गाडीवर अवघडलेली बारकी पोरे, होणारे अपघात, तापलेले उन्ह यामुळे या माणसांवर जगण्याची कोणती आशा समोर राहिलेली नाही, असे दिसत आहे. कोरोना अजून काय काय पहायला लावणार आहे. हे समजत नाही. कोरोनामुळे सगळे जग- शहरे आणि माणूस पुरता विस्कटला आहे, हे मात्र नक्की.