Visual Aid


Color Scheme :

Current Scheme:

×


Font Size :

Current Font Size :

103×


दिव्यांगांच्या वधू-वर मेळाव्याचे अनामप्रेममध्ये आयोजन

  • Home
  • News
  • Uncategorized
  • दिव्यांगांच्या वधू-वर मेळाव्याचे अनामप्रेममध्ये आयोजन

दिव्यांगांच्या वधू-वर मेळाव्याचे अनामप्रेममध्ये आयोजन

अहमदनगर, २२/०४/२०१८

स्नेहालय संचलित अनामप्रेम या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी  वधू-वर मेळावा येत्या शनिवार २८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत  आयोजित करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी असणारा हा मेळावा निंबळक गाव येथील स्नेहालयच्या सत्यमेव जयते ग्राम या प्रकल्पात होणार आहे. या मेळाव्यात संपूर्णतः मोफत प्रवेश दिव्यांगाना असणार आहे. मेळाव्यात जर एखाद्या वधू-वर याचा विवाह जुळल्यास अनामप्रेम द्वारा दुस-या दिवशी रविवार दि.२९/०४/२०१८ रोजी विवाह सोहळा संपन्न होणार आहे,असे अनामप्रेमच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दिव्यांगांचे जीवन पुनर्वसन करण्यासाठी त्यांना त्यांच्या अपंगत्वास पूरक असा जोडीदार मिळणे आवश्यक असते. यामुळे अशा दिव्यांग वधु-वर मेळाव्यातून राज्यातील दिव्यांगांचा परिचर मेळावा आणि विवाह सोहळा आयोजित करणे गरजेचे आहे. हा विचार समोर ठेवून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी अपंग प्रमाणपत्र , आधार कार्ड ,जन्मदाखला, रेशन कार्ड, सोबत २ साक्षीदार पालक आवश्यक राहणार आहेत. विवाह जुळल्यास संस्थेच्या प्रकल्पात होणा-या विवाहास संस्थेतर्फे मणी-मंगळसूत्र लाभार्थींना पुरवले  जाणार आहे. तसेच नवदाम्पत्यास शासकीय सुविधा मिळवून दिल्या जाणार आहेत.मेळाव्यात सहभागी होणा-यांना नाव-नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव-नोंदणी करिता अनामप्रेम, गांधी मैदान, स्नेहालय मागे अहमदनगर येथे दिव्यांगाची नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता ९०११०७७०६०/७३५००१३८०३/९०११०२०१७४ संपर्क करावा. असे आवाहन अनामप्रेमचे अजित माने, सुभाष शिंदे, राधा मिलिंद कुलकर्णी, नाना भोरे, किशोर कुलकर्णी, विधीज्ञ अविनाश बुधवंत करीत आहेत.

कळावे

आपला विश्वासू

अजित कुलकर्णी

९०११०२०१७४

LEAVE A COMMENT